महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अॅन्ड डिस्ट्रीब्युटर्स अॅन्ड अलायन्स लि. (एमएससीडीए) कार्यकारी संचालक वैजनाथ जागुष्टे यांनी या सेवेची ‘लोकसत्ता’ला अधिक माहिती दिली. ‘‘भारतात एक लाख, ७० हजार विविध औषधांची पॅकिंग आज उपलब्ध आहेत. दर महिन्यास एक हजार नवीन औषधांचे ब्रॅंण्डस बाजारात येतात. एवढय़ा औषधांची एकाच वेळी नावे लक्षात ठेवणे, ती रुग्णांना लिहून देणे (प्रिस्क्राईब करणे) किंवा डॉक्टरांनी लिहिलेल्यानुसार बिनचूक औषधे त्वरित देणे औषध विक्रेत्यांना अशक्य आहे. त्यासाठी औषध विक्रेते, डॉक्टरांनी कंपनीकडे शुल्क भरून नोंदणी केल्यास त्यांच्या मोबाईलमध्ये ‘मोबाईल ड्रग डाटा बेस’ ही संगणक प्रणाली कार्यान्वित होऊन त्यांना ही सुविधा सहज प्राप्त होईल. पुण्या- मुंबईसह महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. पुण्या- मुंबईसह राज्यातील बाराशे औषध विक्रेते, डॉक्टर या सेवेचा लाभ सध्या घेत आहेत.
रुग्णास एखादे औषध लिहून देताना त्याचा ब्रॅंण्ड नेम किंवा औषधाचे मूळ नाव, कंपनीचे नाव आठवत नसेल तर मोबाईलमध्ये जाऊन औषधाचे नाव टाईप क रावे नंतर कंपनीने दिलेल्या एका विशिष्ट क्रमांकावर तो संदेश पाठवावा. अवघ्या ३० ते ४० सेंकदात तुम्हाला कंपनीकडून प्राप्त झालेल्या संदेशातून हवी ती माहिती मिळेल. परंतु, एखाद्यावेळी तांत्रिक अडथळा आल्यास कंपनीपर्यंत संदेश पोहोचण्यास अयशस्वी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आयडिया, एअरटेल, टाटा, रिलायन्स, डोकोमो, बीएसएनएल सारख्या विविध मोबाईल कंपन्यांच्या मोबाईलवर ही सुविधा प्राप्त होऊ शकते,’ अशी माहिती जागुष्टे यांनी दिली.
ड्रग डाटा बेस ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी संघटनेचे सभासद असणाऱ्या औषध विक्रेत्यांना सवलत म्हणून वार्षिक सहाशे, तर डॉक्टरांना बाराशे रुपये शुल्क भरावे लागेल. त्यासाठी पुण्यातील केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्ट आणि एमएससीडीए लि. सहावा मजला, कॉर्पोरेट पार्क टॉवर, सायन ट्राम्बे रोड, चेंबूर, मुंबई या पत्त्यावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
काय आहे ड्रग डाटा बेस प्रणाली?
देशातील सर्वात मोठी मोबाईल ड्रग डाटा बेस प्रणाली.
सहा हजार उत्पादकांचे ७० हजार ब्रॅंण्ड्स आणि
एक लाख ७० हजार पॅंकिंग या प्रणालीद्वारे तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होईल.
ही प्रणाली दर आठवडय़ाला येणाऱ्या नवीन औषधांच्या माहितीसह अद्ययावत होईल.
त्पादकोंक डून नवीन औषधे बाजारात येण्यापूर्वीच तुम्हाला त्याची माहिती प्रणालीद्वारे मोबाईलवर मिळणार.
जीपीआरएस आणि एसएमएम सुविधा असणाऱ्या मोबाईवरच ही सेवा कार्यान्वित होईल.
मूळ : लोकसत्ता